Take a fresh look at your lifestyle.

‘तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी येतो तुमच्यासोबत पण…’, मुख्यमंत्र्यांची भाजपला थेट ऑफर!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेते, त्यांचे नातेवाईक यांच्यावर ईडीकडून धाडी टाकल्या जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“तुम्हाला सत्ता पाहिजेत ना. सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात”, असं खुलं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.

“मी कृष्ण नाही. पण तुम्ही कंस बनू नका”

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुमच्या कुटुंबाचे कधी भानगडी काढल्या? याचं शेपूट त्याला, त्याचे शेपूट त्याला जोडलं जातं आहे. एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी थोडसं भावनिक बोलतो. बाबरीच्या खाली राम जन्मभूमी होती. तसे कृष्णजन्मभूमीच्या खाली काही तुरुंग असेल तर बघा. तिथे मला टाका. मी कृष्ण नाही. पण तुम्ही कंस बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

“मर्द असाल तर या मर्दासारखा अंगावर”

‘आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत मग सकाळच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले नसते का? आम्ही जर तुमच्या कुटुंबात पट्टा बांधला तर आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय आहे. मर्द असाल तर या मर्दासारखा अंगावर, सत्तेचा दुरउपयोग करून समोर येतात. शीखंडीला लढण्याची ताकद नव्हती, त्याला मध्ये टाकलं. आता शीखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, हेच कळत नाही. कोण कुणाच्या मागून लढत आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या, नामर्दासारखे लढू नका. यंत्रणा वापरायच्या कुटुंबीयांना बदनाम करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“2014 ला हिंदूच होतो, आजही हिंदूच”

बाळासाहेबांना काय उत्तर देणार? असं विचारताय मग बाळासाहेबांनी तुमच्या नेत्याला वाचवलं. ते जर गेले तर बाळासाहेबांना काय उत्तर देणार. अवघा देश सोबत नव्हता तेव्हा बाळासाहेब एकटे बोलले होते, त्यांना तिथेच राहु द्या. 2014 ला हिंदूच होतो, आजही हिंदूच आहे. तुरुंगात टाकत असाल तर मला टाका. तुरुंगात टाकणार असणार तर माझ्या शिवसैनिकांची मी जबाबदारी घेतो’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.