Take a fresh look at your lifestyle.

6 दिवसात दुसऱ्यांदा CNG महागला, जाणून घ्या तुमच्या शहरात CNG ची किंमत किती?

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – देशात महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. देशासह राज्यात इंधनाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. अशातच भरीस भर म्हणून आता सरकारने पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. IGL ने दिल्ली-NCR आणि आसपासच्या भागात CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग केला आहे. ही वाढीव किंमत शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. या घोषणेमुळे नोएडा-ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये CNG 78.17 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

IMPORTANT! आता केवळ दोन मिनिटात मिळवा Whatsapp वर होम लोन; ‘या’ बँकेची खास सुविधा; असा करा अर्ज

दिल्लीत CNG 75.61 रुपये प्रति किलो
सीएनजीच्या ( CNG) दरात वाढ होतच आहे. आज सकाळपासून सरकारने सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 83.94 रुपये प्रति किलो आणि दिल्लीमध्ये 75.61 रुपये प्रति किलो झाली आहे.

गेल्या 6 दिवसांत सीएनजीच्या दरात झालेली ही सलग दुसरी वाढ आहे. यापूर्वी 15 मे रोजी सीएनजीच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सीएनजी 77.20 वरुन 80 रुपयांवर पोहोचला आहे. 2 रुपये 80 पैसे सीएनजीमध्ये वाढ झाली आहे.

महागाईचा भडका; सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार

इंधनाचे पर्याय महाग
सीएनजी हे वाहनांसाठी स्वस्त आणि सुरक्षित इंधन मानले जाते. त्यामुळे महाग असूनही लोक सीएनजी वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, आता सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हा पर्यायही लोकांना महागात पडत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.