Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय, देशात 3,615 नवे रुग्ण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग कमी होत चालला आहे. सध्या देशात कोरोना रुग्ण ३ हजार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात 3 हजार 615 नवीन रुग्ण आढळले आहेत. काल कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 230 होती. कालच्या तुलनेत 385 रुग्णांची वाढ झाली असली तरी ही संख्या ३ हजारावर आल्याने दिलासा आहे.

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार : यंदा तब्बल ९ पुरस्कार प्राप्त करत राज्याने मारली बाजी

सलग पाच दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर आज कोरोना रुग्णांची संख्या ३८५ ने वाढली आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याची पाहायला मिळत आहे. सध्या देशात 40 हजार 979 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

शिवसेनेचा भाजप, राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासांत 4 हजार 972 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 40 लाख 9 हजार 525 रुग्ण कोरोना बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 217 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्णांचा बरा होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.