Take a fresh look at your lifestyle.

मुंबई विद्यापीठाचं कौतुकास्पद पाऊल; भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त ‘संगीत महाविद्यालय’ करणार सुरू

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठ भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) इंटरनॅशनल म्युझिक कॉलेज (International Music College and Museum) आणि म्युझियम हे पहिले सहा सर्टिफिकेट कोर्सेससह 28 सप्टेंबरपासून प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात येणार आहे. त्यांच्या नावाने जगप्रसिद्ध संगीत महाविद्यालय (musical college) सुरू होईल, अशी इच्छा वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आता राज्य सरकार (State Govt) आणि मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) हे कौतुकास्पद पाऊल उचलले जाणार आहे.

“…तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”; राज ठाकरेंचा इशारा

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भारतीय बासरी, तबला, सितार, हार्मोनियम/कीबोर्ड आणि ध्वनी अभियांत्रिकीचे एक वर्षाचे सर्टिफिकेट कोर्स 150 विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक प्रवेशासह सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उद्धव ठाकरेंच्या ‘बाई’ शब्दोच्चारावर भावना गवळींचे प्रत्युत्तर; व्यक्त केले दुःख

या वर्षी ऑगस्टमध्ये, राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील ग्रंथालय संचालनालयाच्या मालकीचा ७ हजार चौरस मीटरचा भूखंड संगीत महाविद्यालयासाठी सुपूर्द केला होता. मात्र, तात्पुरता उपाय म्हणून महाविद्यालयाला स्वत:ची इमारत मिळत नाही, तोपर्यंत पु.ल.देशपांडे अकादमीकडून हे काम केले जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.