Take a fresh look at your lifestyle.

नीरज चोप्रा Commonwealth Games मधून बाहेर; महत्वाचं कारण समोर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – अवघ्या २ दिवसानंतर बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा सुरु होत आहे. मात्र, या स्पर्धेच्या ऐन तोंडावर भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार अ‍ॅथेलिट नीरज चोप्रानं या स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या वर्षी नीरजने टोकीयो इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धत गोल्ड मेडल पटकावले होते. याशिवाय, नुकत्याच अमेरिकेतील वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत तो सिल्व्हर मेडलचा मानकरी ठरला.

उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर ठाकरी बाण; सांगितला थरारक अनुभव !

सध्या, डॉक्टरांनी नीरजला 20 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे, हेच त्याच्या माघार घेण्याचं मुख्य कारण आहे. या स्पर्धेच्या फायनलनंतरदेखील आपण पूर्ण फिट नाही असं नीरजनं म्हटलं होतं.

अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेलया कॉमनवेल्थ गेम स्पर्धेत नीरज चोप्रा हा गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार होता. मात्र, ऐनवेळी त्याने घेतलेल्या माघारीमुळे भारताचे एक गोल्ड मेडल कमी झाले आहे. बर्मिंगहॅममध्ये 28 जुलै ते 7 ऑगस्टच्या दरम्यान ही स्पर्धा होत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकला क्लिक करा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजनं दोन दिवसांपूर्वीच ऐतिहासिक कामगिरी केली होती. वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय पुरूष खेळाडू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.