Take a fresh look at your lifestyle.

बापरे! पगारात रोख रक्कम नाही तर चक्क ‘सोनं’ देते ही कंपनी; जाणून घ्या यामागील महत्वाचं कारण

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Gold आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करत असते. वर्षभरासाठी प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षभराचं धोरण राबवत असते. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना पगारासह बोनस, ऑफिस टूर किंवा फूड, मार्केटिंग कूपन अशा प्रकारच्या गोष्टी देतात. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची तसेच हा राहण्याची सोय करतात.

जितका चांगला Cibil स्कोअर तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त ; असा चेक करा तुमचा सिबिल स्कोअर

मात्र सध्या इंग्लंडमधली (England) एक कंपनी जोरदार चर्चेत आहे. कंपनी चर्चेत येण्याचं कारणही तसंच आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार म्हणून रोख रकमेऐवजी (Cash) चक्क सोनं (Gold) देत आहे. कंपनीच्या या अनोख्या धोरणाची सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे.

टेलिमनी (Telemoney) नावाची ही कंपनी आहे. दरम्यान, ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची जरा हटके पद्धतीनं काळजी घेत आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना रोख पगाराऐवजी सोनं ऑफर करत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरून पॅरी यांचा स्वतःचा यामागे खास विचार आहे. हा विचार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य आहे, असं ते मानतात. त्यांचा हा विचार विचित्र नसून, कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे या गोष्टीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

जून २०२२ मध्ये तब्बल इतके दिवस बँका राहणार बंद! जाणून घ्या तारखा

प्रायोगिक तत्त्वावर रकमेऐवजी सोनं देण्याचं धोरण

लंडनच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, इंग्लंडमधली टेलिमनी ही कंपनी आर्थिक सेवा(Financial Services) पुरवते. आता ही कंपनी कर्मचाऱ्यांचं वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन ती त्यांना पगाराऐवजी सोनं घेण्याची ऑफर देत आहे. दरम्यान, कंपनीतल्या वरिष्ठ पदावर असलेल्या 20 जणांना या पॉलिसीचा (Policy) लाभ देण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचा फायदा दिसून आल्यास कंपनी उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी देखील हेच धोरण स्वीकारणार आहे. सध्या हे नवं वेतन धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबवलं जात आहे. असं मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरून पॅरी यांनी सांगितलं.

मोठी बातमी! मान्सून पुन्हा लांबला… आता या तारखेला होणार आगमन

कर्मचाऱ्यांचं भविष्य असेल उज्ज्वल

कॅमेरून म्हणाले, पौंडच्या घसरणीनंतर, सोन्यात गुंतवणूक केली तर ती कर्मचाऱ्यांना महागाईच्या तुलनेत नेहमीच पुढे ठेवेल. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी कंपनीने सोनं देण्याचं धोरण सुरू केलं आहे. पगार म्हणून रोख रक्कम घ्यायची की सोनं हा निर्णय सर्वस्वी कर्मचाऱ्यांचा असेल. टेलिमनी कंपनीच्या या नव्या धोरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीनं आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजन केलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचाही विचार केला आहे, असं म्हणत अनेक जण या कंपनीचं कौतुक करत आहेत.

जून २०२२ मध्ये तब्बल इतके दिवस बँका राहणार बंद! जाणून घ्या तारखा

Comments are closed.