Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! ‘आयएनएस विक्रांत फाईल्स’ प्रकरणी किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या; राजकारणात खळबळ

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये मोठी चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीवर नेहमी कोणते ना कोणते आरोप भाजपतर्फे होत राहतात. तर दुसरीकडे भाजप आपल्या सत्तेच्या जोरावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून केला जातो.

मात्र, यावेळी आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आपल्या मुलासह मोठ्या अडचणीत सापडले आहे. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा करण्यात आलेला निधी जमा केला नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका माजी सैनिकाने उडी घेत किरीट सोमय्या आणि त्याच्या मुलाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

राज्यात उन्हाचा तडाखा कायम – विदर्भासह मराठवाड्यात ५ दिवस उष्णतेची लाट; ‘या’ ठिकाणी बरसणार पाऊस

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांची पोलखोल केली आहे. आता या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या,निल सोमय्या आणी त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे.

2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? नसल्यात आता भरा इतका दंड…

काय आहे प्रकरण?

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती.आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.