Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या अफवा : आमदार कानडे

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : राज्यातील काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या खोट्या वावड्या उठवल्या जात आहेत. प्रत्यक्षात हे आमदार दिल्लीला प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. यावेळी ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतील नाही तर काय मुलायमसिंग यांची भेट घेणार का? असा सवाल काँग्रेसचे श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडे यांनी उपस्थित केला.

शहरात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसंगी आमदार कानडे बोलत होते. ते म्हणाले, आमदारांकरिता संसदेच्या ‘पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसीस’ या संस्थेमार्फत दिल्ली येथे दि. ५ व ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे. यासाठी राज्यातील २५ व एकूण ११९ सदस्य या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या केवळ खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. वास्तविक माझ्या मतदारसंघात ३०० कोटिंची विकास कामे सुरू आहेत. इतर आमदारांच्याही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. त्यामुळे नाराजी असण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता दिल्लीला दोन दिवसाचे प्रशिक्षण असल्याने या निमित्ताने काँग्रेसच्या पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. काँग्रेसचे आमदार सोनिया गांधींची भेट घेणार नाहीतर काय मुलायम सिंग यांची भेट घेणार का?असा सवालही त्यांनी शेवटी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.