Take a fresh look at your lifestyle.

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ‘हा’ पक्ष देणार एका कुटुंबाला एकच तिकीट!

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – देशात सध्या भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतंय. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेससहित इतर पक्षांकडून बऱ्यापैकी प्रयत्न सुरु आहेत. अशातच, काँग्रेसच्या गोटातून एक अतिशय महत्त्वाची तर देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा देशभरात मोठी झेप घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या सर्वच दिग्गज नेत्यांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.

रेशन दुकानदारांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, उचललं मोठं पाऊल

काँग्रेसच्या आजच्या चिंतन शिबिरात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काँग्रेस आता एका कुटुंबाला निवडणुकीचं एकच तिकीट देणार आहे. याचा अर्थ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला ते तिकीट मिळेल. दुसऱ्या सदस्याला तिकीट हवं असल्यास त्याने पक्षासाठी निदान 5 वर्षे काम केलेलं असणं अनिवार्य असेल. त्या व्यक्तीने पक्षासाठी सक्रीय काम केलं असेल तरच त्या व्यक्तीला तिकीट मिळेल. काँग्रेसच्या चिंतन शिबिरात आज असे अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

BREAKING! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या ग्राहकांना RBI कडून पैसे काढण्यावर बंदी; ग्राहकांच्या पैशाचं आता काय होणार?

काँग्रेस चिंतन शिबिरात कार्यकारिणीने अनेक निर्णयांना मान्यता दिली :

1) काँग्रेस संघटनेत एकाच पदावर एक टर्म (5 वर्षे) पूर्ण केल्यानंतर पुन्हा लगेच संधी मिळणार नाही. 3 वर्षांचा कुलिंग ऑफ कालावधी असेल आणि त्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती करता येईल.

2) प्रत्येक राज्यात राजकीय व्यवहार समिती असेल.

3) शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

4) MSP हमी कायदा करेल. एमएसपीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांची पिके खरेदी करता येणार नाहीत.

5) संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जातील.

6) CWC मध्ये एक उपसमिती देखील स्थापन केली जाईल, जी सर्व प्रकरणांवर काँग्रेस अध्यक्षांना मत देईल.

7) एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल, दुसर्‍या सदस्याने पक्षाला 5 वर्षे दिली असतील, म्हणजे पक्षासाठी सक्रिय काम केले असेल तरच तिकीट मिळेल.

मोठी बातमी! क्रिकेटविश्वाला मोठा झटका! प्रसिद्ध क्रिकेटपटूचा कार अपघातात मृत्यू

8) काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी समिती स्थापन केली जाईल, ज्याचे सदस्य CWC मधून घेतले जातील. ही समिती संसदीय मंडळाप्रमाणे काम करेल ज्याची मागणी G23 नेत्यांनी केली होती. म्हणजे महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर अध्यक्ष या समितीचे मत घेतील.

9) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटना, ओबीसी/एससी/एसटी महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल.

10) शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

11) वीजबिल माफ आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली जाईल.

12) देशातील अंतर्गत निवडणुका आणि निवडणुकांसाठी पक्षात कायमस्वरूपी विभाग तयार करण्यात येणार आहे.

13) आम्ही सत्तेत आल्यास ईव्हीएमवर बंदी घालू आणि पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेऊ.

14) काँग्रेस चिंतन शिबिरामध्ये राजकीय समितीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावांना उदयपूर डिक्लेरेशन या नावाने घोषित करण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीची समितीची बैठक संपली की ही घोषणा करण्यात येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Comments are closed.