Take a fresh look at your lifestyle.

कॉंग्रेस आमदारांना खरोखरंच उशीर की जाणीवपूर्वक उशिरा आले?, चर्चांना उधाण

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मोठ्या सत्तासंघर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपला राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. बहुमतात १६४ मतं तर विरोधात ९९ इतकी मतं पडली.

महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुकीसंदर्भात संजय राऊतांचा मोठा दावा

यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीवरून आता विधान भवनात जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत. या आमदारांना खरंच उशीर झाला की ते जाणीवपूर्वक उशिरा आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, माविआच्या आमदारांनी बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशीच दांडी मारणे म्हणजे एकप्रकारे शिंदे गटाला मदत करण्यातला हा प्रकार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Breaking News! अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

विधानसभेत आज सकाळी कामकाज सुरू झाले. शिंदे-फडणवीस सरकार हे आज बहुमत सिद्ध करणार असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादीतील प्रमुख नेते सभागृहात उपस्थित होते. पण काँग्रेसचे बरेच आमदार आणि बडे नेते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार झिशान सिद्धीकी, धीरज देशमुख विधान भवनात पोहोचले. आमदार शिरीश चौधरी, माजी मंत्री विजय वड्डेटीवार, निलेश लंके, संग्राम जगताप, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची धावपळ झाली. विधान भवनात उशिरा पोहचल्याने दरवाजे बंद झाले. यामुळे ते मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. दरवाजे बंद झाल्याने बाहेरच उभे राहावे लागले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

हे काँग्रेस आमदार अनुपस्थित…

१. अशोक चव्हाण
२. प्रणिती शिंदे
३. जितेश अंतापुरकर
४. विजय वडेट्टीवार
५. झिशांत सिद्दीकी
६. धिरज देशमुख
७. कुणाल पाटील
८. राजू आवळे
९. मोहन हंबर्डे
१०. शिरीष चौधरी

एकनाथ शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; शिवसेनेच्या गटतेपदाबाबत मोठा निर्णय

हे आमदार अनुपस्थित होते. यातील प्रणिती शिंदे या परदेशात आहेत. तर जितेश अंतापूरकर हे लग्न असल्याने ते येऊ शकले नाहीत. पण इतर आमदारांना खरंच उशीर झाला का? असा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.