Take a fresh look at your lifestyle.

शिंदे गटाला दिलासा! बंडखोर आमदारांना कोर्टाचे संरक्षण; तात्काळ सुनावणीला नकार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. महत्वाचं म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात हा वाद पोहोचला असून शिंदे गटासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं व्हीप बजावलेल्या 16 आमदारांवर सध्या कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश विधानसबभा अध्यक्षांना न्यायालयाने दिले आहेत. महत्वाचं, म्हणजे हे आदेश देत असताना तात्काळ सुनावणी घेण्यासही कोर्टाने नकार दिलाय.

बंडाच्या निर्णयाला आधार नाही? शरद पवारांकडून बंडखोरांना आव्हान

शिवसेनेत बंडखोरी केलेल्या 16 आमदारांविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश एनव्ही रमाना यांच्या अध्यक्षतेखालील या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी CJI यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती हिमा कोहली आणि कृष्णमुरारी यांचाही समावेश होता.

या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने सरन्यायाधीशांकडे केली होती. शिवसेनेच्या गटाच्या आमदारांना उद्या विधानसभा अध्यक्षासमोर उत्तर द्यायचे आहे, अशा स्थितीत या प्रकरणाची आज सुनावणी व्हायला हवी अशी मागणी सिब्बल यांनी केली.

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मात्र, आज सुनावणी घेण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे शिंदे गटाला दिलासाच दिला आहे. तसंच, याचिका दाखल केलेल्या शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. या प्रकरणी नव्याने खंडपीठ स्थापन केले जाईल, त्यानंतर सुनावणी घेतली जाईल, तोपर्यंत 16 आमदारांवर कारवाई करू नये, असे कोर्टाने स्पष्ट आदेश दिले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.