Take a fresh look at your lifestyle.

श्री सिध्दीविनायक पतसंस्थेच्या स्मार्ट कार्डचा शुभारंभ

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : डिजिटल बॅंकिंग सेवा देणाऱ्या श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेने नववर्षा निमित्त ग्राहक व व्यावसायिकांसाठी “स्मार्ट डिस्काउंट कार्ड” योजना सुरू केली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अविनाश आपटे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड होते. सुरवातीला संस्थेचे चेअरमन वासुदेव काळे यांनी योजनेची माहिती देवून संस्था देत असलेल्या डिजिटल सेवा तसेच नगर जिल्ह्यात क्युआर कोड सेवा देणारी पहीली पतसंस्था असल्याचे सांगितले. ते म्हणाले संस्थेला सहकार चळवळीतील अनेक पुरस्कार मिळाल्याने नवी ऊर्जा मिळाली.

सहकारी संचालक व कर्मचारी यांची साथ यामुळेच हे शक्य झाले. स्मार्ट डिस्काउंट कार्ड योजनेमध्ये प्रत्येक ठेवीदाराना सुरवातीला स्मार्ट डिस्काउंट कार्ड देण्यात येईल. पुढच्या टप्यात संस्थेच्या सर्व ग्राहकांना या योजनेत जोडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून श्री सिध्दीविनायक पतसंस्थेला सुमारे २५ हजार ग्राहक जोडलेले आहेत.

यावेळी भांड यांनी संस्था देत असलेल्या विविध सेवेबद्दल समाधान व्यक्त करुन श्रीरामपूरच्या अर्थकारणात संस्थेचा मोठा सहभाग असल्याचे सांगीतले. आपटे यांनी संस्थेचे कर्मचारी देत असलेल्या सेवा व अध्यक्ष काळे यांच्या कामा बद्दल समाधान व्यक्त करुन संस्था लवकरच २०० कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब कोकरे, लोन कमिटी चेअरमन वर्षा जोशी, संचालक अनिल कुलकर्णी. सुनील बोलके, अभिमन्यु जोशी, मनजीतसिंग बत्रा, दिलीप महाजनी यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यावसायिक, पत्रकार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदिप शहा, रविंद्र भागवत, बाविस्कर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले,

श्री सिध्दीविनायक व श्री महालक्ष्मी महिला पतसंस्था यांचे कर्मचारी, ठेव प्रतिनीधी यांनी परिश्रम घेतले. बाळासाहेब कोकरे यांनी स्वागत तर दिगंबर कुलकर्णी यांनी आभार मानले. अडॅ.अजय चोधरी यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.