Take a fresh look at your lifestyle.

देशात चौथ्या लाटेचा धोका; ‘या’ राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मंगळवारी जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली. जगातील 10 देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने थैमान घातले आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, फ्रान्स, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रिया या देशांचा समावेश आहे. देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

हा चौथ्या लाटेचा धोका असू शकतो

हा चौथ्या लाटेचा धोका ही असू शकतो. कारण आकडे त्याच दिशेने निर्देश करत आहेत. भारताचे आकडेही चिंता वाढवणारे आहेत. गेल्या 28 दिवसांत देशात 5,474 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 40 हजार 866 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, ही देखील दिलासा देणारी बाब आहे की, या चार आठवड्यात 58 हजार 158 लोक संसर्गातून बरेही झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील 29 जिल्ह्यांमध्ये कोरोना अनियंत्रित आहे. म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांहून अधिक आहे.

राज्यांना सतर्कता वाढवण्यास सांगितले

आरोग्य मंत्रालयाने ५ राज्यांसाठी इशारा जारी केला आहे. त्यात दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. मंत्रालयाने या राज्यांना सतर्कता वाढवण्यास सांगितले आहे. आरोग्य सचिवांनी सांगितले की, या राज्यांमध्ये दररोज पॉझिटिव्हीटी रेट वाढत आहे, म्हणजेच दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. केरळ व मिझोराममधील स्थिती सर्वात वाईट आहे. येथे पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे.

22 ते 28 मार्च या कालावधीत सर्वाधिक मृत्यू

महाराष्ट्रात सर्वाधिक 4007 आणि केरळमध्ये 81 मृत्यू झाले आहेत. सुधारित आकडेवारीमुळे महाराष्ट्रात मृतांचा आकडा वाढला आहे. राज्य सरकारने येथे जुन्या मृत्यूचीही भर घातली आहे. या संख्येमुळे या आठवड्यात मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यानंतर 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 315 आणि 5 ते 11 एप्रिल दरम्यान 223 मृत्यू झाले. 15 ते 21 मार्चपर्यंत देशात 471 जणांना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. पण पुढच्याच आठवड्यात म्हणजे 22 ते 28 मार्च दरम्यान मृतांची संख्या 4465 वर पोहोचली. 25 मार्च रोजी सर्वाधिक 4100 मृत्यू झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.