Take a fresh look at your lifestyle.

कोरोना, मंकीपॉक्सनंतर लँग्या व्हायरसचा उद्रेक; कशी आहेत लक्षणं?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

बीजिंग : चीननंतर जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे अजूनही थैमान कायम आहे. मंकीपॉक्सचे संकटही आले असून आता आणखी एका धोकादायक व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. ज्या चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला त्याच चीनमध्ये आता नवीन जुनोटिक विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. लँग्या असे या विषाणूचे नाव आहे.

लहानमुलांमधील अपंगत्व निर्मूलन काळाची गरज – डॉ.निखिल चल्लावार

चीनमध्ये लँग्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 35 प्रकरणे समोर आली आहेत. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, हे रुग्ण शेडोंग आणि हेनान प्रांतात आढळले आहेत. याबाबत लोकांना सतर्क करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 2 टक्के बकरी, 5 टक्के श्वान आणि काही इतर प्राणी या व्हायरसचे पॉझिटिव्ह आहेत. हा विषाणू प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरण्याची शक्यता असते. हा विषाणू संसर्गजन्य आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच आतापर्यंत या विषाणूमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सामूहिक राष्ट्रगान अभूतपूर्व सोहळा

दरम्यान, या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होत असल्याचेही समोर आले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.