Take a fresh look at your lifestyle.

तो पुन्हा आलाय! देशावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट..! राजधानी दिल्लीनं वाढवलं टेन्शन

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. (Delhi Corona) यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाच्या 517 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. (Delhi Corona) यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाच्या 517 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे पॉझिटिव्हिटी दर हा 4.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीत ज्याप्रकारे कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patients in India) वाढ होत आहे, त्यावरुन कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यताही वाढली आहे. तर तेच दुसरीकडे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरुन आताच काही भाष्य करणे हे योग्य नाही. ते घाईचे ठरेल.

काय सांगता? गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट वाचाच!

तर ते सरकारचे म्हणणे आहे की, अजून घाबरायची काहीही आवश्यकता नाही. कारण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे. तर तेच होम क्वारंटाईन होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. दिल्लीत शनिवार्यंत 772 रुग्ण हे होम क्वारंटाईन होते. त्यांच्या संख्या रविवारी वाढून 964 इतकी झाली आहे. तेच 1 एप्रिलला होम क्वारंटाईनमध्ये असलेल्यांची संख्या ही 332 इतकीच होती. मात्र, त्यांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

IPL 2022 – विराट कोहलीच्या टिप्स कामी, चेन्नई टीमच्या पुणेकरानं केले 10 बॉलमध्ये 50 रन; व्हिडीओ व्हायरल

दिल्लीत गुरुवारी 325 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. तर पॉझिटिव्हिटी दर हा 2.39 टक्के इतका होता. तर तेच शुक्रवारी 366 बाधितांची नोंद करण्यात आली. यानंतर शनिवारी 461 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी पॉझिटिव्हिटी दर हा कमी झाला. मात्र, 50 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. कोरोना चाचण्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, 5 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येचा दर हा धोकादायक आहे.

यंदा ज्या राज्यांमध्ये कडक उन्हाळा, तिथे बरसणार चांगला पाऊस? हवामान खातं काय सांगताय वाचाच!

Leave A Reply

Your email address will not be published.