Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे गटाला न्यायालयाकडून धक्का; ‘या’ प्रकरणी निर्णय देताना फेटाळली याचिका

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयाबाहेर आणि न्यायालयात देखील रंगला. यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा करताना शिवसेनेचे धनुष्यबाण हे निशाण केवळ आम्हालाच मिळायला हवे अशी भूमिका मांडण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण निर्णय गोठवण्याचा निर्णय घेत अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरते शिंदे गट आणि ठाकरे गटाला स्वतंत्र पक्षचिन्ह देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती, या याचिकेला नुकतेच न्यायालयाने फेटाळून लावले आहे.

घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर; केंद्र सरकारकडून महागाईत घट झाल्याचा दावा

नव्याने न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने तात्पुरते दिलेले पक्षचिन्ह वापरावे लागणार आहे. त्यामुळे या प्रलंबित वादाला शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. न्यायालयात ठाकरे गटाकडून बाजू मांडताना शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याबाबत बाजू मांडण्यात आली होती, मात्र न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या बाजूने निर्णय देत ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे.

ठाकरे गट-शिंदे गट एकत्रीकरण होणार?; दीपक केसरकरांचे सूचक विधान

यापूर्वी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दोन तलवार आणि ढाल हे चिन्ह दिले असून ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून नवीन निर्णय येत नाही तोवर सध्यातरी ठाकरे गटाला मशाल चिन्हावर समाधान मानावे लागणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचे तसेच खरी शिवसेना कुणाची प्रकरण सध्याही सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असून याबाबतीत देखील निर्णय प्रलंबित आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.