Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलमधून मिळणार टीम इंडियाला नवीन कॅप्टन; जाणून घ्या कोण आहे ‘हा’ क्रिकेटपटू?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – क्रिकेट आयपीएल स्पर्धेचा १५वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. हा सिझन खूप महत्त्वाचा आहे. विराट कोहली आता कॅप्टन नाही. रोहित शर्मा विशेषत: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. त्यामुळे भविष्यात टीमची कॅप्टनसी कोण करेल, हे याच स्पर्धेत पाहिलं जाईल. कॅप्टनसीच्या शर्यतीमध्ये श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे खेळाडू सध्या आघाडीवर आहेत.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मार्च अखेरपर्यंत होणार तब्बल इतक्या कोटींची कर्जमाफी!

दरम्यान, आयपीएलच्या या १५व्या सिझन मधून भारतीय क्रिकेट टीमला भविष्यातील कॅप्टन मिळेल असं मत टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयोजित केलेल्या एका खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शास्त्रींनी भविष्यातील संभाव्य कॅप्टन म्हणून सध्या चर्चेत असलेल्या खेळाडूंची नावंही सांगितली.

ज्याच्याबद्दल कुणी ऐकलं देखील नव्हतं त्या श्रेयस अय्यरला गेल्या आयपीएल सिझनमध्ये सर्वांनी पाहिलं. ज्यावेळी आयपीएल स्पर्धा संपली तेव्हा तो भारतीय टीममध्ये उत्तम खेळाडू बनला. हीच आयपीएलची खरी खासियत आहे.’ गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं बॉलिंग करण्याच्या प्रश्नाचं अद्याप उत्तर दिलेलं नाही. मात्र, यावेळी हार्दिकवर संपूर्ण देशाची नजर असेल, असंही शास्त्री यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक शेवटचा खेळताना दिसला होता. मात्र, त्यांनतर सततच्या पाठदुखीमुळे तो एकही मॅच खेळलेला नाही. तरीदेखील गुजरात टायटन्स या नव्या आयपीएल टीमनं त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

अलर्ट! राज्यभरात पुन्हा कोरोनाचा अलर्ट; राज्य सरकारच्या हालचालींना वेग

यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी रवी शास्त्री आणि सुरेश रैना हे स्टार स्पोर्ट्सच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत. आगामी आयपीएलमध्ये फास्ट बॉलर्सवर अधिक लक्ष दिले जाईल. कारण, यावर्षी टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातील फास्ट आणि बाऊन्स होणाऱ्या पिचवर खेळला जाणार आहे, असं शास्त्रींनी यावेळी सांगितलं.

खुशखबर! CISF मध्ये 249 रिक्त जागांसाठी भरती, तब्बल 81 हजारपर्यंत मिळेल पगार

 

Leave A Reply

Your email address will not be published.