Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 बटलर-परागची हुशारी पाहिलीत का? चक्क SIX चे केलेय OUT मध्ये रूपांतर

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – IPL 2022 आयपीएल २०२२ सध्या जास्त फॉर्ममध्ये आहे. जसजशा टीम्स अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहेत तसतशी सामन्यांमधील चुरस वाढताना दिसत आहे. रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं लखनऊ सुपर जायंट्सवर (RR vs LSG) 24 धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थानचे आता 16 पॉईंट्स झाले असून त्यांनी ‘प्ले ऑफ’ च्या दिशेनं दमदार पाऊल टाकले आहे. राजस्थानच्या या विजयात त्यांच्या दमदार फिल्डिंगचाही वाटा होता. जोस बटलर (Jos Buttler) आणि रियान पराग (Riyan Parag) या जोडीनं एकत्रितपणे फिल्डिंग करत सिक्स जाणाऱ्या बॉलचे आऊटमध्ये रूपांतर केले.

अखेर प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता

लखनऊ आणि राजस्थान या दोन्ही संघानी आतापर्यंत 13 पैकी 8-8 सामने जिंकले आहेत. या विजयानंतर राजस्थानची टीम दुसऱ्या क्रमांकावर आली असून लखनऊची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. लखनऊची शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी तर राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. टॉप 2 मध्ये राहण्यासाठी त्यांना हे सामने जिंकणे आवश्यक आहे.

दरम्यान, या चुरशीच्या सामन्यात एक भारी प्रसंग घडला. लखनऊची इनिंग सुरु असताना 13 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर घडलेला हा प्रसंग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.राजस्थानकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कृणाल पांड्यानं (Krunal Pandya) लाँग ऑफच्या दिशेनं फटका मारला. त्या भागात फिल्डिंग करत असलेल्या बटलरनं तो कॅच पकडला. पण, त्याचवेळी आपण आता बांऊड्री लाईनच्या पलिकडं जात असल्याची जाणीव त्याला झाली. त्यावेळी बटलरनं तो बॉल तातडीनं जवळ उभ्या असलेल्या परागच्या दिशेनं फेकला. परागनं कोणतीही चूक न करता तो कॅच पकडला आणि कृणालला परत पाठवलं.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करा ; कमी गुंतवणुकीत उभारा मोठी रक्कम

राजस्थाननं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 178 रन केले होते. लखनऊला त्याला उत्तर देताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 154 रनच करता आले. लखनऊकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 59 रन केले. हुड्डा आणि कृणाल जोडीनं चौथ्या विकेटसाठी 65 रनची भागिदारी करत लखनऊच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. बटलर-पराग जोडीनं जबरदस्त कॅच घेत लखनऊला मोठा धक्का दिला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.