Take a fresh look at your lifestyle.

पाहा Cricket VIDEO – एका रात्रीत स्टार बनलेल्या शेन वॉर्ननं टाकलेला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ पाहिलात का?

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Cricket VIDEO क्रिकेटच्या इतिहासात 29 जून हा दिवस खूप खास आहे. 4 जून 1993 रोजी याच दिवशी (On This Day) ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लेग स्पिनर शेन वॉर्ननं (Shane Warne) एक बॉल टाकला. त्या बॉलला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे म्हंटले जाते. इंग्लंड विरूद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या अ‍ॅशेस टेस्टच्या सीरिजमध्ये वॉर्ननं टाकलेला तो बॉल आजही फॅन्सच्या लक्षात आहे. वॉर्ननं त्या बॉलवर इंग्लंडचा अनुभवी क्रिकेटपटू माईक गॅटींगला आऊट केलं. त्यानंतर शेन वॉर्ननं एका रात्रीतून स्टार बनला.

1993 साली अ‍ॅलन बॉर्डरच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियन टीम इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस सीरिज खेळण्यासाठी गेली होती. त्या सीरिजची पहिली टेस्ट मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होती. इंग्लंडचा कॅप्टन ग्रॅहम गूचनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 289 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मार्क टेलरनं सर्वात जास्त 124 रन केले. इंग्लंडकडून पीटर सचनं 6 विकेट्स घेतल्या.

रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक बघाच; जूनमध्ये लोणार लॉन्च

बॉल ऑफ द सेंच्युरी का?

मँचेस्टर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 4 जून 1993 रोजी वॉर्ननं बॉल ऑफ द सेंच्युरी टाकला. शेन वॉर्ननं त्याच्या स्पेलमधील पहिलाच बॉल लेग स्पिन टाकला. तो बॉल लेग स्टम्पच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर 90 अंशामध्ये वळाला आणि माईक गॅटींगचा ऑफ स्टम्प उडाला. तो बॉल पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला होता. क्रिकेट विश्वात या पद्धतीनं बॉल कधीही वळाला नव्हता. त्यामुळे त्या बॉलला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे जाहीर करण्यात आले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.