Take a fresh look at your lifestyle.

भारतासमोर रशियाने ठेवला मोठा प्रस्ताव! कच्च्या तेलाचा हा प्रस्ताव भारत स्वीकारेल का?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मॉस्को – गेल्या बऱ्याच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून विविध पडसाद पाहायला मिळाले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अमेरिकेसह युरोपातील बऱ्याच देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधदेखील लादले आहेत. सध्या सर्वात जास्त निर्बंध असणाऱ्या देशांपैकी रशिया प्रथम स्थानावर आहे.

प्रत्यक्षात युद्ध सुरु होण्यापूर्वी अमेरिकेसारख्या देशांनी युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, युद्धाला सुरुवात झाल्यांनतर या आश्वासनांकडे पाठ फिरवली गेली. दरम्यान, रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी विविध आर्थिक निर्बंध लादून मॉस्कोला एकटे पडण्याचा प्रयत्न युरोपातील देशांकडून सुरूच आहे. मात्र, पाश्चात्य देशांकडून लादल्या गेलेल्या निर्बंधांना न जुमानता रशिया मात्र वेगळाच डाव खेळताना दिसत आहे. रशियाने तेल आणि इतर वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट द्यायला सुरुवात केली आहे. व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याच्या घटनेनंतर हे घडत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारत रशियन सवलतीच्या कच्च्या तेलाची ऑफर स्वीकारू शकतो.

सुरुवातीला अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांना रशियाकडून तेल आयातीवर निर्बंध लादायचे नव्हते. कोणत्याही कठोर निर्णयामुळे तेलाच्या किमती भडकतील याची त्यांना भीती होती. मात्र, रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरूच ठेवली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जागतिक आर्थिक पॅराहच्या टॅगसह मॉस्कोमध्ये आयात केलेल्या रशियन तेलावर अमेरिकेच्या निर्बंधांची घोषणा केली होती.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही युक्रेनसोबतच्या संघर्षाच्या निषेधार्थ रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय युती तयार करण्याचे आणि तेल आणि वायूच्या निर्यातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या मोहिमेची घोषणा केली आहे.

रशियन तेल भारत स्वीकारेल का?

एका संस्थेच्या अहवालानुसार, निर्बंधांद्वारे मॉस्कोला एकटे पाडण्याचे पाश्चात्य प्रयत्न असूनही, भारत कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीत खरेदी करण्यासाठी रशियन ऑफर स्वीकारू शकतो. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो, तो रशियाकडून फक्त 2-3 टक्के तेल खरेदी करतो. परंतु, या वर्षी आतापर्यंत तेलाच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत, सरकार ते वाढविण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे वाढती ऊर्जा बिले कमी होण्यास मदत होऊ शकते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.