Take a fresh look at your lifestyle.

Cyclone Asani – असनी चक्रीवादळाने बदलला मार्ग, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम, कुठे बरसणार पाऊस?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Cyclone Asani सध्या देशासह महाराष्ट्रात हवामान कमालीचा बदल झाला असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, सध्या पश्चिम बंगालच्या खाडीत हवेचा कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला असून त्यामुळे असनी चक्रीवादळाची (Asani Cyclone) निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला असून आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) दिशेने वाटचाल केली आहे. हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

ड्राइविंग लायसन्स बनवण्याचे बदलले नियम… आता करावे लागणार ‘हे’ काम

बुधवारी सकाळच्या सुमारास असनी चक्रीवादळ हे काकीनाडा आणि विशाखापट्टनमच्या किनारपट्टीच्या भागात धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान वादळी वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि यनम या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 12 मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

एटीएममधून पैसे काढताय? ‘या’ लाईटकडे लक्ष द्या; अन्यथा खाते होईल रिकामं

असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील (Asani Cyclone affect on Maharashtra) कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather update : राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट; पाहा तुमच्या शहरात किती तापमान!

राज्यातील पुढील हवामानाचा अंदाज

11 मे

कोकण – तुरळ कठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

इलेक्ट्रिक वाहने खरच पर्यावरणपूरक आहेत का? Electric Vehicle मागचं धक्कादायक सत्य माहितेय का?

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

Comments are closed.