Take a fresh look at your lifestyle.

सीतरंग चक्रीवादळ : दिवाळीत महाराष्ट्राला वादळी फटका बसण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी काही दिवसांत दिवाळीसारखा मोठा सण पुढे असताना सर्व जनता हा सण साजरा करण्यासाठी तयारीला लागली आहे. अनेकांची खरेदी सुरु असून पुष्कळ लोक पर्यटन स्थळी भेट देण्याची प्लॅनिंग करत आहे. महागाई जरी असली तरी लोक आपल्या परीने दिवाळी सणाला साजरे करतात, परंतू राज्यातील जनेतेसमोर ऐन दिवाळीच्या तोंडावर अस्मानी संकट घोंघावत असून यापासून कसे लढावे हा प्रश्न अनुत्तरित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दिवाळीसाठी सर्वजण घरादारासोबतच परिसराची देखील साफसफाई करतात, सुंदर रोषणाई करतात हा प्रकाशाचा सण असल्याने दारात दिव्यांची आरास लावण्यात येते. याशिवाय सुंदर रांगोळीने आंगण सजून उठते, नेमक्या दिवाळतीच या सर्व गोष्टींवर पाणी फेरण्याचे चिन्हे निर्माण झाली आहे. कारण पुढे आ वासून उभे राहणार आहे सीतरंग चक्रीवादळाचे संकट.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्राचे गुपित काय? अखेर झाला खुलासा!

यंदा बंगालच्या उपसागरात अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढल्याची स्थिती निर्माण झाली होती, नेमका असाच काहीसा प्रकार येत्या २० व २१ ऑक्टोबर रोजी घडणार असून सीतरंग नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता कोलकाता येथील आयएमडी अंतर्गत कार्य करणाऱ्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. जर हे वादळ निर्माण झाले व त्याचा जोर अधिक राहल्यास महाराष्ट्राला याचा फटका बसण्याची शक्यता वाढणार आहे, दक्षिण पूर्व दिशेकडून येणारे वादळी वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वृष्टी करू शकतात. हे वारे दिशा व वेग बदलणारे ठरू शकतात त्यामुळे महाराष्ट्रासोबतच छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश राज्य तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागापर्यंत ते धडकू शकतात. यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पावसामुळे प्रभावित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

“गर्जा महाराष्ट्र माझा” गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित!

या वादळी वाऱ्यांचा मुक्काम अंदमानातून हलला असून ते बंगाल उपसागराच्या खाडीत पोहचले आहे, जिथे त्यांची कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गती वाढल्यास महाराष्ट्रातील नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, नांदेड, वर्धा, जळगांव, अकोला, वाशीम तसेच पश्चिमेकडे अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात ते थेट पोहचत अतिवृष्टी करू शकतात. त्यामुळे यंदा दिवाळी पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे, यामुळे शेवटी जनतेच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.