Take a fresh look at your lifestyle.

सायरस मिस्त्री यांचा अपघात काहीतरी शिकवतोय; शरद पवारांचे मोठे विधान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि राजकीय तसेच औद्योगिक जगताला सर्वच स्तरावर धक्का बसला. मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, श्रद्धांजली वाहताना पवारांनी सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत वेगळे निरीक्षण नोंदवून मोठी सूचनाही केली आहे.

सायरस मिस्त्री : एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली; हळहळल्या सुप्रिया; सहकाऱ्यांच्या आठवणी

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन म्हणजे देशासह राज्यातील औद्योगिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. हा अपघात काहीतरी शिकवत आहे. चांगले रस्ते हे जमेची बाजू आहे. पण चांगले रस्ते म्हणून गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे, असं मोठं विधान सायरस मिस्त्री यांना आदरांजली वाहताना पवारांनी केलं आहे.

अखेर मविआच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द : ठाकरेंना पुन्हा दे धक्का!

शरद पवार पुढे म्हणाले की, देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या जडणघडणीत पारशी समाजातील अनेकांनी मोठे योगदान दिले असून योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या यादीत मिस्त्री गट हा अत्यंत महत्त्वाचा गट आहे. त्यांनी सुरुवातीला टाटांसह चांगले काम केले. एक काळ असा होता की मिस्त्री ग्रुपची टाटा समूहात टाटा पेक्षा जास्त गुंतवणूक होती. नंतर रतन टाटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर टाटा समूहाचे नेतृत्व सायरस मिस्त्री यांच्याकडे गेले आणि ते अध्यक्ष झाले.

ए फॉर अमेठीनंतर आता बी फॉर बारामतीचा परफेक्ट कार्यक्रम : भाजपाची तयारी

ते खूप जवळून काम करत होते परंतु दुर्दैवाने त्यांच्यात काही मतभेद झाले आणि त्यांना गट सोडावा लागला. दरम्यान, त्यांनी टाटांचा राजीनामा दिला आणि आपले काम सुरू केले. सायरस मिस्त्री हे अतिशय सुस्वाभावी आणि कमी बोलणारे गृहस्थ होते. कुठेही कटुता होणार नाही याची त्यांनी नेहमी काळजी घेतली. मिस्त्री कुटुंबातील नवीन पिढीतील ते अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते, असेही शरद पवार पुढे म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.