Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक दर्जेदार चित्रपटांमुळे दर्शकांच्या पसंतीस उतरलेल्या ६०-७० च्या दशकातील अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा पारेख यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये अभिनय केला असून यामध्ये राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, अमिताभ बच्चन तसेच धर्मेंद्र इत्यादींचा समावेश आहे.

त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये कटी पतंग, तिसरी मंझिल, दिल देके देखो, कारवा , प्यार का मौसम, मेरा गांव मेरा देश इत्यादी सुप्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. आशा पारेख या बहुप्रतिभाशाली अभिनेत्री असून त्यांनी हिंदी व्यतिरिक्त कन्नड, पंजाबी व गुजराती चित्रपटांमध्ये देखील अभिनयाची चमक दाखविली आहे.

शिवसेनेचा भाजप, राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

नगरकर अनुभवणार पुन्हा एकदा अनुभवी आणि धारदार लेखणीची ताकद….!

दादा साहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते त्यामुळे त्यांच्या स्मृती व कार्याचा गौरव म्हणून हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार देण्यात येत असतो. सध्या आशा पारेख या ७९ वर्षांच्या असून कुठल्याही समाजमाध्यमांवर त्या सक्रिय नाही. या अगोदर त्यांनी टेलिव्हिजन कार्यक्रमात प्रमुख अतिथी किंवा परीक्षक म्हणून उपस्थिती लावली आहे व अधूनमधून त्या या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.