Take a fresh look at your lifestyle.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचं निधन; पंतप्रधान मोदी गहिवरले, म्हणाले…

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

ब्रिटन : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II Death) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजपदावर कोण विराजमान होणार याबाबतची चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या निधनानंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीसुद्धा ट्विट करत एलिझाबेथ यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

“२०१५ आणि २०१८ साली युक्रेन दौऱ्यावर असताना माझी महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यांचा प्रेमळपणा आणि दयाळूपणा कधीच विसरणार नाही. एका भेटीत महाराणी एलिझाबेथ यांनी मला, महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी त्यांना दिलेला रूमाल दाखवला होता. त्या नेहमी आठवणीत राहतील.” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

कारकीर्द

राणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडनमध्ये झाला होता. तिने 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीस आणि डेन्मार्कच्या प्रिन्स फिलिपशी विवाह केला. नोव्हेंबर 1948 मध्ये तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे नाव प्रिन्स चार्ल्स ठेवण्यात आले. 6 फेब्रुवारी 1952 रोजी वडिलांच्या मृत्यूनंतर ती राणी एलिझाबेथ बनली.

Leave A Reply

Your email address will not be published.