Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तारखेपासून डेबिट-क्रेडिट कार्डचे बदलणार नियम; वाचा सविस्तर…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सप्टेंबर महिना संपायला फक्त तीन-चार दिवस उरलेले आहेत. १ ऑक्टोबरपासून बँकांशी संबंधित अनेक नियम दिवसेंदिवस बदलणार आहेत. हे बदल तुमच्या-आमच्यावर परिणाम करतील. डेबिट आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. यासाठी आरबीआयने मुदतही दिली आहे. याशिवाय इतर अनेक विभागही नियम बदलणार आहेत.

चोपड्यातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा वहनोत्सवासह रथोत्सव : चारशे वर्षांची परंपरा

असे सांगण्यात आले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम 1 ऑक्टोबरपासून बदलेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते, टोकनायझेशन सिस्टममध्ये बदल केल्यानंतर, कार्डधारकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव मिळेल. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. जर एखाद्या ग्राहकाने डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (POS) किंवा अ‍ॅपद्वारे व्यवहार केला तर सर्व तपशील एनक्रिप्टेड कोडमध्ये सेव्ह केले जातील.

मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा; २०१४ ला मी नको म्हणून नाकारलं शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद

सध्या हे सर्व तपशील कंपनीच्या सर्व्हरवर सेव्ह आहेत. त्याऐवजी ते आता एनक्रिप्टेड कोडवर सेव्ह केले जातील. त्यामुळे आता फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित सेवा असेल. रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड डेटा गोळा करण्यास बंदी घातली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात पर्यायी कोड द्यावा लागेल. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल.

PFI चा फायदा भाजपालाच; काँग्रेसचे टीकास्त्र

अलट पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी बदल करण्यात आला आहे. कर (TAX) भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. जर तुम्ही करदाते असाल आणि तुम्हाला ही योजना हवी असेल तर तुम्ही सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.