Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दोघांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा; भारत-फ्रान्सची युनोच्या सुरक्षा परिषदेकडे मागणी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांना आतंकवादाची झळ पोहचली असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जगभरातील आतंकवाद्यांचे उगमस्थान काही विशिष्ट देश असून यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानात अनेक आतंकवाद्यांनी तळ ठोकलेला आहे ज्यांच्यावर कडक कारवाई होणे अत्यावश्यक आहे. नुकतेच फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयासोबतच भारताने देखील संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेला पाकिस्तानातील दोन आतंकवाद्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढला; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

अली कासिफ जान व मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर अशी आतंकवाद्यांची नावे असून ते जैश -ए – मोहम्मद संघटनेचे आतंकवादी आहेत. पुलवामा हल्ल्यामध्ये या दोन आतंकवाद्यांचा प्रामुख्याने संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय पठाणकोट हल्ल्यात देखील हे दोन्ही आतंकवादी सक्रिय असल्याचे भक्कम पुरावे भारताकडे आहे. सध्या पाकिस्तानातून दहशतवादी नेटवर्क हे दोघे चालवत असून जगातील विविध देशातील आतंकवादी संघटनेसोबत त्यांचे संबंध आहे.

अखेर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

लवकरच फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना भारताच्या दौऱ्यावर येत असून १४ व १५ सप्टेंबर रोजी त्या दिल्लीत असणार आहे तत्पूर्वी दोन्ही देशांनी दोन पाकिस्तानी आतंकवाद्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी युनोच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.