Take a fresh look at your lifestyle.

मंत्रिमंडळ विस्तार रखडला; दीपक केसरकरांनी सांगितलं महत्वाचं कारण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. त्यानंतर बरेच आमदार तसेच नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला मात्र अजूनही महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला नाही.

भाजपाला धक्का; उद्धव ठाकरेंनी सोलापुरात उघडलं खातं

राज्यात अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. शिंदे आणि फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगत असले तरी विस्तार का रखडला आहे? याबाबत आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून काहीही सांगण्यात येत नव्हतं.

कोणाला किती मंत्रिपदं द्यायची? दोन्ही पक्ष आणि अपक्षांसाठीचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला काय? यावरून विस्तार रखडल्याचं बोललं जात होतं. पण आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं खरं कारण सांगितलं आहे. पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून समजेल. विस्ताराला वेळ लागला तरी चालेल, पण सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचं आहे आणि तो आमच्याकडून राखला जात आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरिम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.