Take a fresh look at your lifestyle.

संरक्षणमंत्र्यांचं मोठं विधान; “पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तेव्हाच…”

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून नेहमीच चर्चेत आहे. 1994 मध्ये भारतीय संसदेने पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून परत घेण्याबाबतचा ठरावही मंजूर केला होता. मात्र, त्यात अद्याप यश आलेले नाही. काश्मीरमध्ये याबाबत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तो दिवस दूर नाही.” असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे.

असदुद्दीन ओवैसीला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर; हिजाब मुद्द्यावरून घेरले

‘शौर्य दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. भारतीय लष्कराचे कौतुक करताना राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि इतर मुद्द्यांवरही भाष्य केले. “भारतीय सैन्य हे जगातील सर्वोत्कृष्ट आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी आम्ही जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकत्र करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान पुन्हा भारताचा भाग होत नाही, तोपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार नाही.” असे राजनाथ सिंह म्हणाले.

बीसीसीआय सचिवांची मोठी घोषणा; महिला आणि पुरुष खेळाडूंना मिळणार समान मानधन

“तो दिवस फार दूर नाही”

दरम्यान, या भागांचा भारतात समावेश होण्याचा दिवस आता दूर नाही, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. “पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख आपण समजू शकतो. पाकिस्तानकडून त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. या बाजूला काश्मीर आणि लडाख नव्या क्षितिजाकडे वाटचाल करत आहेत. हे फक्त सुरूवात आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान भारतात आल्याशिवाय ही मोहीम पूर्ण होणार नाही. तो दिवस दूर नाही.” असे विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.