Take a fresh look at your lifestyle.

राजसाहेब तुमच्या इतकी शब्दसंपदा नाही, भेटायला येतो – देवेंद्र फडणवीस

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मला राज ठाकरेंसारखे शब्द सुचले नाहीत, आता थेट भेट घेऊनच त्यांचे आभार मानणार, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा आज सभागृहात म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या नावे एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये राज ठाकरे यांनी फडणवीसांचं खूप कौतुक केलं होतं.

उपमुख्यमंत्रिपद स्विकारावं लागल्याने अनेकांनी फडणवीसांवर शेरेबाजी केली, काहींनी खिल्लीही उडवली. मात्र, याला बढती आहे की अवनती यात मी जात नाही, पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही!, असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना धीर दिला.

कॉंग्रेस आमदारांना खरोखरंच उशीर की जाणीवपूर्वक उशिरा आले?, चर्चांना उधाण

त्यावर, आभार व्यक्त करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सुंदर पत्र लिहिलं. मी उत्तर देणार होते. पण, त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाही. फोन करुन आभार मानले. मी राज ठाकरेंची भेटही घेणार आहे”.

शिंदे सरकार बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी

शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत पहिली अग्निपरीक्षा यशस्वीरित्या पार केली. त्यानंतर आज या नव्या सरकारने विधिमंडळात आपलं बहुमतही सिद्ध केलं. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान केलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

Breaking News! अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं.

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

Leave A Reply

Your email address will not be published.