Take a fresh look at your lifestyle.

‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे देणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस संतप्त; कठोर कारवाई करण्याचा इशारा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टर इस्लामिक संघटनेच्या देशभरातील विविध ठिकाणांवर एनआयए ने छापेमारी केली होती. महाराष्ट्रात देखील या संघटनेने चांगलेच जाळे फैलले असून पुण्यात या संघटनेचे अनेक संशयास्पद साहित्य महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला आढळून आल्यानंतर अनेक जणांना अटक करत कारवाई करण्यात आली होती. यावेळी साहित्य देखील जप्त करण्यात आले होते. या कारवाई विरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्त्यांनी काल पुण्यात निदर्शने करत ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ इत्यादी घोषणाबाजी केली होती. भारतात पाकिस्तानचा जयघोष करणारे नारे लावणे हा निंदनीय व संतापजनक प्रकार असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“उलटसुलट बोलालं तर याद राखा…!”; ‘या’ शिवसेना नेत्याने दिला नारायण राणेंना सज्जड दम

सदर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. असे लोक सोडल्या जाणार नाही. दरम्यान कालच्या निर्दशनावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर कठोर भूमिकेचा पवित्रा घेतल्याने याबाबत काय कारवाई केली जाते ते लवकरच कळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.