Take a fresh look at your lifestyle.

देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; महाविकास आघाडी नेत्यांवर सूचक विधान

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्धव ठाकरे यांची कालची सभा ही चांगलीच चर्चेचा विषय बनली असून शिंदे गट व भाजपवर त्यांनी कडाडून टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावत पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील शरसंधान केले होते. यावर आता उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यत्तर दिले आहे. देवेंद्र फडवणीस हे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची कालची सभा व त्यांचे वक्तव्य अतिशय नैराश्यपूर्ण असे होते. कालचा मेळावा व त्यात उद्धव ठाकरे यांचे भाषण यामध्ये काहीच दम नव्हता. जेव्हा आमच्यासोबत निवडून आला व आमच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा का राजीनामे दिले नाही, असा खोचक सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना केला.

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गौतम अदानी ‘मातोश्री’वर; राजकीय चर्चांना उधाण

मागील अडीच वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने मला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु “मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर ए खुदा होता है” असा शेर देखील यावेळी फडणवीसांनी ठाकरेंना उद्देशून बोलून दाखविला. तीन जणांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला असा अप्रत्यक्ष टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.