Take a fresh look at your lifestyle.

खरचं ५० आमदारांना ‘खोके’ दिले का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे; ‘या’ नेत्याचे भावनिक आवाहन

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ५० आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप होत असतो. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत टीका करण्यात आली होती. हे प्रकरण शमले नसून बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर ५० ‘खोके’ म्हणून टीकेची झोड उठवत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणाऱ्या ५० आमदारांमध्ये बच्चू कडू देखील एक होते.

सोनिया गांधी यांचे ऋषी सुनक यांना पत्र; म्हणाल्या, “भारतीयांना तुमचा सार्थ अभिमान”

नुकतेच या टीकेवर आपले मौन सोडत बच्चू कडू यांनी आक्रमकपणे रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे तसेच ५० खोके प्रकरण नेमके खरे काय आहे याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी खुद्द करावे असे निवेदन बच्चू कडू यांनी दिले आहे. यावेळी पत्रातील मजकूरापैकी ठळक मुद्द्यात कडू यांनी नमूद केले आहे की, “विरोधकांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले त्यामुळे त्यांचा झालेला जळफळाट समजू शकतो. राज्याच्या विकासाची खुंटलेली गती आणि जनादेशाचा आदर करत ५० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले होते. तेव्हापासून ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून दलाली करून स्टंटबाजी करणाऱ्या रवी राणाकडून माझ्यावर आरोप होत आहे.”

अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास संपला; हवामान विभागाची घोषणा

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “सत्तेवर लाथ मारणारा माझ्यासारखा स्वाभिमानी व्यक्ती असले आरोप सहन करणार नाही. म्हणून मी रवी राणा विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. रवी राणा हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचे जवळचे असल्याचे सांगतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० खोके खरचं आमदारांना दिले का हे स्पष्ट करावे.”

इस्रोने रचला इतिहास; ‘बाहुबली’ रॉकेट LVM3 चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

यापूर्वी अनेकदा राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे परंतु रवी राणा यांच्या दुटप्पी टीका धोरणामुळे संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ५० खोके प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचे भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या काळात या मोठ्या नेत्यांकडून रवी राणा यांना समज मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.