Take a fresh look at your lifestyle.

‘दैनिक अजिंक्य भारत’चे हेलिकॉप्टरमधून वितरण; मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, प्रसंगी लोटली वाचकांची गर्दी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगरः गेली दोन-तीन महिने जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता लागली होती. जिल्ह्याच्या समाजमाध्यमांत आणि प्रसार माध्यमांत दैनिक अजिंक्य भारतची चर्चा सुरू झाली होती. त्यातही रोज नव्या टिझर्समुळं तर ‘दैनिक अंजिक्य भारत’ कसा असेल, याची उत्कंठा लागली होती. परंतु ‘दैनिक अजिंक्य भारत’ हवेतून येणार म्हणजे नेमकं काय करणार आणि पाऊस असताना तो कसा येणार, याचंही औत्सुक्य वाढलेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नगरकरांना सतावणारा पाऊस पाहता हवेतून अंक कसा येणार, याचंही सर्वांना आश्चर्य होतं. अखेर तो क्षण आला ‘अजिंक्य भारत’च्या स्वागतासाठी जणू पावसानेही विश्रांती घेतली सकाळी पडलेलं अगदी स्वच्छ ऊन आणि पोलीस परेड ग्राऊंड गर्दीनं फुललेलं बघायला मिळालं. ठीक सकाळी १० वाजून ५० मिनिटाच्या ठोक्याला हेलिकॉप्टरनं आकाशात घिरट्या घातल्या आणि ‘अंजिक्य भारत’चं प्रकाशन मान्यवरांनी केलं यामुळे अनेक दिवसांची उत्सुकता संपली.

भारतीय अर्थव्यवस्था अस्थिरतेतही सावरेल; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला विश्वास

‘दैनिक अंजिक्य भारत’चा अंक केवळ हेलिकॉप्टरनं आला नाही, तर या हेलिकॉप्टरनं ‘दैनिक अंजिक्य भारत’च्या नगर-मनमाड रस्त्यावरील कार्यालयावर फेर्‍या मारल्या. त्यातून कार्यालयावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं पोलिस परेड ग्राऊंडवर मान्यवरांची मांदियाळी जमली होती. या वेळी क्रिकेटपटू विनोद कांबळी, आमदार प्रा. राम शिंदे, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सूर शेख आदींनी सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात, माहेर ब्युटी पार्लरच्या संचालक शुभांगी थोरात, ‘दैनिक अंजिक्य भारत’चे संपादक रामदास ढमाले, व्यवस्थापकीय संचालक कांचन बिडवे, सरव्यवस्थापक अविनाश कराळे, सह्याद्री फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक अ‍ॅड. एकनाथ भालसिंग यांना भेटून ‘दैनिक अंजिक्य भारत’च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“निकोप समाजासाठी सक्षम न्यायव्यवस्थेची गरज”-पंतप्रधान नरेंद्र मोदी

विनोद कांबळी, प्रा. शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके यांनी कार्यालयात येऊन संदीप थोरात, ढमाले यांच्यासह ‘अजिंक्य भारत’च्या टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवर विनोद कांबळी, आमदार जगताप, आमदार लंके यांनी कार्यालयीन कामकाजाची तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मची माहिती घेतली. प्रकाशनाच्या निमित्ताने ‘दैनिक अजिंक्य भारत’च्या कार्यालयाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यालयावर हेलिकॉप्टरमधून सरव्यवस्थापक अविनाश कराळे आणि ‘सह्याद्री फायनान्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक ईश्वर मचे यांनी पुष्पवृष्टी केली. हेलिकॉप्टरचे संयोजक कृष्णा कदम यांनीही ‘याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. कार्यालयाला भेटी देणार्‍यांचे ढोलपथकाकडून स्वागत केले जात होते.

‘या’ बँकेच्या ग्राहकांकरिता आनंदाची बातमी; सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ

या वेळी भाजपच्या ‘सोशल मीडिया’ विभागाचे जिल्हा प्रमुख सचिन पोटे, राष्ट्रवादी काँगेसचे जामखेड तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अनिल फुंदे, अ‍ॅड. अनुराधा येवले, उपअभियंता शांतीलाल लाड, सुधीर टोकेकर, लेखक व दिग्दर्शक प्रमोद कसबे, अभिनेत्री किरण तळेकर, ‘ज्योतीक्रांती मल्टीस्टेट’चे अध्यक्ष, श्रीकांत मांढ, विजयसिंह होलम, अशोक झोटींग, प्रा. सुभाष चिंधे, अतुल लहा, मिलिंद देखणे, डॉ. सूर्यकांत वरकड, संदीप कुलकर्णी, मयुर मेहता, विठ्ठल शिंदे, प्रसाद दकर, सचिन चोभे, डॉ. श्रीधर दकर, सिद्धीनाथ मेटे महाराज, सतीश गुंजाळ, अ‍ॅड. धनंजय म्हस्के, गजेंद्र सोनवणे, सुधाकर थोरात, अमीर सय्यद, समीर दाणी, नीळकंठ कराड, दीपक खोसे, रावसाहेब निकाळजे, सुभाष दिवटे, विशाल चव्हाण, दीपक वाघमा, अविनाश येळवंडे, सुनील गर्जे, वसंत सानप, तुकाराम अंदु, रामहरी रोडे, दिनकर थोरात, अमोल इथापे, अविनाश कांबळे, नगर शहरातील प्रमुख वितरक अमित भांड, गणेश गांधी, प्रमोद पंतम, बिपीन काटे, संजय गो, सपक सुरम, सुनील जोशी, सुनील गिते, अमित भांड, शुभम गो, संजय गटणे, नंदू गवळी, भारत भस्मे, जाहिरात असोसिएशनचे अध्यक्ष, नितीन देशमुख, प्रसाद मांढ, लैलेश बारगजे, अनुप सप्तर्षी, मनोज गोसावी, विष्णू बडे पाटील, वैभव कराळे, सोमनाथ राऊत, युवराज भो, सतीश पाटोळे, संदीप लोखंडे, संदीप नरवडे, नितीन फुल्लुके, दीक्षा चिचघरे, रूपल दोडके, नानासाहेब सुपेकर, प्रल्हाद एडके, राजेंद्र रमेश राऊत, अनिल पठा, अशोक काळे, गणेश आंबिलवाडे, बाळासाहेब पाचारणे, सुभाष लांडगे, सुधाकर थोरात, विकास घोरपडे, शरद पवार, प्रकाश पोटे, राजेंद्र राऊत इत्यादी उपस्थितांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.