Take a fresh look at your lifestyle.

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 महत्त्वाची कामं; अन्यथा बसेल मोठा फटका

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिना हा वर्षाचा सर्वात महत्वाचा महिना मानला जातो. दरवर्षी 31 मार्च रोजी अनेक कामांसाठी, अंतिम मुदत असते. येत्या 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2021-22 संपेल आणि 1 एप्रिल 2022 पासून बरेच नियम बदलले जातील. अशा परिस्थितीत, हा महिना संपण्यापूर्वी, ज्या कामांची मुदत या महिन्यानंतर संपेल. ते सर्व महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या. कारण नंतर दंड भरावा लागू शकतो. चला जाणून घेऊया ती 5 कामे कोणती आहेत जी या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करणे आवश्यक आहे.

पॅन आधार लिंक

सरकारने पॅनकार्डला आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जर तुम्ही अजून तुमचा पॅन नंबर आधारशी लिंक केला नसेल, तर आता अजिबात उशीर करू नका. जर वेळेत तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर, तुमचे पॅन कार्ड रद्द केले जाईल. यासोबतच आयकर कलम 272 बी अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागेल.

बँक खात्याचे केवायसी अपडेट करा

RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने KYC Update पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्याच्या अखेरीस तुमचे केवायसी अपडेट न केल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. KYC केवळ बँकेतच नाही तर इतर अनेक अत्यावश्यक सेवांशी संबंधित कामातही महत्त्वाचे असते.

अग्रिम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख

आर्थिक वर्ष 2021-22 साठी अग्रिम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर तुम्हाला तुमचा टॅक्स वेळेवर भरावा लागतो. तसेच जर एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर कलम 234 ए /234 बी अंतर्गत व्याज लागू होईल. ज्येष्ठ नागरिकांना अग्रिम टॅक्स भरण्यापासून सूट आहे..

गुंतवणूक करून कर वाचवण्याची शेवटची संधी

चालू आर्थिक वर्ष 2021-22 हे 31 मार्च रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत, चालू आर्थिक वर्षासाठी कर सवलत फक्त 31 मार्चपर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर उपलब्ध असेल. तुम्ही अद्याप तुमच्या कर-बचत गुंतवणुकीचे नियोजन केले नसेल, तर ते शक्य तितक्या लवकर करा. आर्थिक नियोजकाचा सल्ला घेतल्यानंतर तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक करा.

हयातीचा दाखला देणे

सरकारने पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला बँकेत सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 वरून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात. देशभरातील पेन्शनधारकांसाठी त्यांची पेन्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा ब्रेकशिवाय मिळवण्‍यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो.

Leave A Reply

Your email address will not be published.