Take a fresh look at your lifestyle.

Jio 5G लाँच होण्यापूर्वी करा ‘हे’ काम, नाहीतर…

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या 5G स्मार्टफोनची मागणी खूप वाढली आहे. कारण भारतात लवकरच 5G सेवा (5G India) सुरू होणार आहे. भारतात 5G स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर, विविध दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या 5G सेवा सुरू करण्याच्या त्यांच्या योजना जाहीर केल्या. खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनेही दिवाळीपर्यंत 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

अलीकडेच Jio AGM 2022 मध्ये कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की, दिवाळीला देशात Jio 5G सेवा सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात, Jio 5G फक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये लॉन्च केले जात आहे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनी उधळली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमने

करावं लागेल हे काम

कंपनीने खुलासा केला आहे की, जर तुम्ही Jio वापरकर्ता असाल आणि या चार शहरांपैकी एकाचे रहिवासी असाल तर तुम्हाला Jio 5G वापरण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. 4G सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनवर 5G सेवा काम करणार नाही. हा हाय-स्पीड इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करणे आवश्यक आहे.

नागपूर दौऱ्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो?

तुमचा फोन 5G सेवांना सपोर्ट करतो की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, खाली दिलेल्या पॉईंट्स फॉलो करा.

  • तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जा,
  • त्यानंतर ‘वायफाय आणि नेटवर्क’ पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर ‘सिम आणि नेटवर्क’ निवडा.
  • येथे तुम्हाला ‘Preferred Network Type’ अंतर्गत दिसेल ज्या तंत्रज्ञानाला तुमचा फोन सपोर्ट करतो.
  • जर तुम्हाला सूचीमध्ये 5G दिसत असेल तर तुमचा फोन या सेवेसाठी वैध आहे.
  • जर नसेल तर तुम्हाला 5G सपोर्ट असलेला फोन खरेदी करणे आवश्यक आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.