Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो घाई नको! मान्सून वेळेआधी आला असला तरी ‘या’ कारणामुळे पेरणी करू नका

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचित हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस (Pre-monsoon rains) असल्याने कदाचित हा पाऊस (rain) थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. दरम्यान आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

मान्सूनपूर्व पावसाचं राज्यात थैमान; ‘या’ भागातील मंदिर परिसरात गुडघाभर पाणी, रस्ते पाण्याखाली

ते म्हणाले की, खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ही त्यांनी भुसे यांनी दिल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

सोनं खरेदीदारांना दिलासा! सोन्याचे दर घसरुन 50 हजारांखाली; जाणून घ्या नवे दर

शेतमाल निर्यातीसाठी असलेल्या मालाच्या दर्जा तपासणी नोंदणीच्या प्रणालीमध्ये देशातील 72,280 शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्रातील 62,344 शेतकरी आहेत. भारतातील 129 भौगोलिक मानांकनापैकी महाराष्ट्रातील 26 आहेत. देशात भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकरी 5,260 आहेत. त्यापैकी 4390 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

IPL २०२२ मोठी बातमी… आयपीएलच्या फायनल सामन्यात मोठा बदल! मोठं कारण समोर

महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी, कांदा, मिरची या पिकांच्या निर्यातीत आघाडीवर आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या 65 टक्के फळे, 55 टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. देशात सर्वाधिक 4500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही आपल्या महाराष्ट्राची बलस्थाने असल्याचे ते म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.