Take a fresh look at your lifestyle.

कौन्सिलरपदी डॉ. सुर्वे यांची बिनविरोध निवड

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषिविद्या विभागात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. उल्हास शांताराम सुर्वे यांची इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमी, नवी दिल्ली या संस्थेच्या कौन्सिलरपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

डॉ. सुर्वे यांचेकडे अखिली भारतीय समन्वीत एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्पाचा पदभार आहे. त्याचप्रमाणे ते सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन देखील कार्यभार सांभाळत आहेत. डॉ. सुर्वे यांचे आत्तापर्यंत 58 संशोधनपर लेख, 70 मराठी लेख, 4 पुस्तके प्रकाशीत केली आहेत. गेल्या 17 वर्षापासून ते सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणुन कार्यरत असून त्यांनी एम.एस्सी. (कृषी) च्या 20 विद्यार्थी व आचार्य पदवीच्या 5 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत 350 हून अधिक कार्यक्रमात शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन पध्दती व फर्टिगेशन तंत्रज्ञान, एकात्मिक शेती, संवर्धीत शेती व सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केले आहे. डॉ. सुर्वे यांच्या कौन्सिलरपदी झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे विद्यापीठाच्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.