Take a fresh look at your lifestyle.

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; २५ जुलै रोजी घेणार शपथ

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत 17 खासदार आणि 100 हून अधिक आमदारांनी क्रॉस व्होट केल्याचे समोर आले आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत.

शाहूनगरमध्ये भरदिवसा तरुणाचा खून ; परिसरात प्रचंड खळबळ

पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 540 खासदारांची मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मते मिळाली. पहिल्या फेरीत द्रौपदीला मिळालेल्या मतांचे मूल्य 3 लाख 78 हजार आणि यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मूल्य 1 लाख 45 हजार होते. दरम्यान, पहिल्या फेरीत 15 मते रद्द झाली.

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला मारहाण व शारिरीक छळ

मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांनाही प्रचंड मते मिळाली. दुसऱ्या फेरीत आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या १० राज्यांची मोजणी झाली. या फेरीत एकूण 1 हजार 886 मतं वैद ठरली. त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना १ हजार ३४९ मते मिळाली. त्या मताचे मूल्य 4 लाख 83 हजार 299 आहे. तर यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य 1 लाख 79 हजार 876 होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाले असून मतमोजणी झाली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. विजयानंतर द्रौपदी मुर्मू आता २५ जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी २४ जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.