Driving license Online apply process
Driving license असा करा ऑनलाईन अर्ज
- तुम्हाला भारत सरकारच्या राज्य रस्ते मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://parivahan.gov.in/parivahan/ या वेबसाइट वर जावे लागेल.
- इथे तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. जिथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवांवर क्लिक करावे लागेल.
- येथे स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्टचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला महाराष्ट्र निवडावा लागेल.
- आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात पोर्टलवर एक फॉर्म येथे मिळेल. येथे न्यू लर्नर लायसन्सवर क्लिक करावे लागेल.
- सुरवातीला तुम्हाला शिकावू परवाना लर्नर लायसन मिळेल.
- शिकाऊ लायसन साठी आगोदर तुम्हाला एक ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल.
- ही परीक्षा फक्त कॉम्पुटर वरच देता येईल.
- परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला लर्नर लायसन मिळेल.
- लर्नर लायसन Learning Licence download मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता.
- ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी तुम्हाला RTO कार्यालयात जावे लागेल.
- ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला लायसन मिळेल.
- हे लायसन तुम्हाला पोस्टाने घरपोच पाठविले जाते.