Take a fresh look at your lifestyle.

दसरा मेळावा : शिवसेनेच्या दोन्ही गटांची तयारीसाठी लगबग; १८०० लालपरी अन् ३ हजार खासगी गाड्या आरक्षित

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार असून शिंदे व ठाकरे गट परस्पर बळ दाखविण्यास सज्ज झाले आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी अथक प्रयत्न घेताना दिसून येत आहे. उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी महामंडळच्या १८०० लालपरी गाड्या, याशिवाय १५० खासगी गाड्यांची बुकिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे. उद्या होणाऱ्या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांना आणणे तसेच त्यांच्या खानपानाची व्यवस्था करणे इत्यादींवर शिंदे गटातर्फे विशेष लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या केवळ प्रवासाची व्यवस्था बघता १० कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.

फडणवीस-पटोलेंची बंद दाराआड चर्चा; राजकीय खलबतं शिजल्याचा अंदाज

एकनाथ शिंदे यांच्या बांद्रा -कुर्ला संकुल येथे होणाऱ्या सभेकरिता सुमारे दिढ लाख लोक येणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने १४०० बसेसची बुकिंग केल्याची बातमी आहे. यामुळे दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केल्या जाण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी गाड्या बुकिंग करण्याकरिता शिंदे गटाने १० कोटी रुपये आणले कुठून असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतीत ईडीने चौकशी करावी अशी मागणी देखील लोंढे यांनी केली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.