Take a fresh look at your lifestyle.

दसरा मेळावा : शिंदे गटाला उच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर एकनाथ शिंदे याचा गट हा शिंदे गट म्हणून ओळखला जातो. राज्यात शिंदे गट व भाजपची युतीचे सरकार अस्तित्वात असून आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा अनेकदा शिंदे गटाकडून करण्यात येतो. दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार याकरिता शिंदे गट व शिवसेनमध्ये चुरस लागली होती. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाचे नाट्य गेल्या अनेक दिवसांपासून रंगले होते. हा वाद न्यायालय दरबारी होता ज्यावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. नुकताच या प्रकरणावरचा पडदा उठला असून आज न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे.

आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल; UIDAIची माहिती

आजच्या सुनावणी दरम्यान दावे प्रतिदावे तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आहे, त्यामुळे येत्या दसऱ्याला शिंदे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेता येणार नाही आहे. याअगोदर भविष्यातील वादविवाद बघता मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे व शिंदे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली होती. हा मुद्दा संवेदनशील असून दोन्ही गटाचे समर्थक आमने सामने येत कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळे येत्या काळात याबाबतीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.