Take a fresh look at your lifestyle.

दसरा मेळावा : सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला खोचक टोला; न्यायालयाच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यापासून सातत्याने शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा कलगीतुरा रंगला असून विविध मुद्द्यांवर हे दोन्ही गट एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. दरम्यान दसरा मेळाव्याचे स्थान शिवाजी पार्क मिळावे याकरिता गेले काही दिवसांपासून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एकमेकांवर टीका करत असून हा वाद न्यायालयात गेला होता व काल उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी दिली. आता या निर्णयावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असून राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, काही नेत्यांकडून कायमच न्यायालयाच्या भूमिकेवर संशय घेण्यात येतो. परंतु यावेळी निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने आता तरी त्यांचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर विश्वास वाढेल. अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे देणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस संतप्त; कठोर कारवाई करण्याचा इशारा

दसऱ्याला अजून वेळ असून याप्रकरणी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करणार का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे बीकेसी मैदानची सफाई सुरु असून एकाचवेळी राज्यात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतील अशी देखील शक्यता आहे. सध्याची स्थिती बघता शिंदे गटाकडून राजकीय हालचालींना वेग आला असून ऐनवेळी काय दृश्य बघायला मिळते हे येत्या काळात लवकरच कळेल. सध्यातरी उद्धव ठाकरे यांचा याप्रकरणी विजय झाला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.