Take a fresh look at your lifestyle.

मुंबईत ईडीची कारवाई; हाती लागलं मोठं घबाड

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : ईडीने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. ईडीला सराफा व्यापाऱ्यांच्या परिसरात मोठं घबाड सापडले असून त्यामध्ये 91.5 किलो सोने आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. पारेख अ‍ॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे. ईडीने गेल्या आठवड्यात तपासादरम्यान हा घोटाळा उघड केला.

शोध मोहिमेदरम्यान ईडीला मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकर्सच्या झडतीदरम्यान, योग्य नियमांचे पालन न करता लॉकर्स चालवले जात असल्याचे ईडीला आढळून आले. ईडीला असे आढळले आहे की, कोणतेही केवायसी पाळले गेले नाही आणि लॉकरच्या आवारात कोणतेही सीसीटीव्ही नव्हते आणि कोणतेही रजिस्टर नव्हते.

राज्यात ‘या’ कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’

ईडीने लॉकर्सची झडती घेतली तेव्हा त्यांना 761 लॉकर्स सापडले, त्यापैकी ३ लॉकर्स मेसर्स रक्षा बुलियनचे होते. लॉकर चालवताना 2 लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. याशिवाय, मेसर्स रक्षा बुलियनच्या परिसरातून अतिरिक्त 188 किलो चांदीदेखील जप्त करण्यात आली आहे. हे सर्व सोने-चांदी ईडीने जप्त केले आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी रुपये आहे.

ईडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या चार परिसरांमध्ये शोध मोहीम राबवली. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासंदर्भात ही झडती घेण्यात आली. यापूर्वी, ईडीने मेसर्स पारेख अ‍ॅल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध 8 मार्च 2018 रोजी पीएमएलए 2002 च्या तरतुदींनुसार मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. कंपनीवर बँकांची फसवणूक करून 2,296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

19 सप्टेंबरपासून बेळगावमध्ये ‘अग्निवीर’ भरती मेळावा

कर्जाद्वारे मिळालेली रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून पळवण्यात आले. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले गेले. ईडीचा दावा आहे की, या प्रकरणात कर्ज घेण्याचा उद्देश नव्हता आणि अशा व्यवहारांसाठी कोणताही करार केला गेला नाही. ED द्वारे 2019 मध्ये एकदा 46.97 कोटी आणि 158.26 कोटी या प्रकरणात संलग्न केले होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.