Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ED आणि NIAचे छापे; २० जणांना अटक

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आता महाराष्ट्रातील तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आहे. तब्बल १३ राज्यांत PFI च्या शंभरहून जास्त ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावात ईडी आणि एएनआयने छापे टाकले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तब्बल २० जणांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! दरदिवशी राज्यात सात शेतकरी आत्महत्या

PFI संबंधित पुण्यात चार ठिकाणी धाडी टाकणे सुरू आहे. PFIचे नेते रझी अहमद खान यांच्या घरावर कारवाई छापे टाकले आहे. PFIबाबतीत या गुन्ह्यांत NIA, GST, ED आणि महाराष्ट्र ATS यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. राज्यात आतापर्यंत PFIच्या तब्ब्ल २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईमधील वेरूळच्या सेक्टर २३ मधील धारावे गावातही NIA धाड टाकली आहे. NIAच्या टीमने मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर रात्री ३ वाजता धाडी सुरू आहे.

मालेगावात ED, NIAने छापा टाकला असून PFI संघटनेच्या एका सदस्याला पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सैफुरहेमान असं ताब्यात घेण्यात आलेल्यांचे नाव आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.