Take a fresh look at your lifestyle.

‘ईडी’चे देशाच्या राजधानीसह पंजाब, हैद्राबादमध्ये ३५ ठिकाणी छापे; केजरीवाल म्हणाले…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने देशात पुन्हा एकदा छापेमारीला सुरुवात केली असून, याअंतर्गत देशाची राजधानी दिल्ली यासह पंजाब राज्य तसेच हैद्राबादला ईडीने लक्ष्य केले आहे. या जागी तब्बल ३५ ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली असून, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप असलेल्या कथित दारूघोटाळा प्रकरणासोबत या छपेमारीला जोडत दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील सरकारवर टीका केली आहे.

ग्लोबल वॉर्मिंग : राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार; उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

ईडीच्या सदर छापेमारीवर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मागील तीन महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी तसेच सीबीआय मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी ५०० हुन अधिक छापे मारण्यात आले असून २४ तास अधिकारी याकामी पुरावे शोधत आहे, परंतु काही झालेच नसल्यावर पुरावे मिळणार कुठून. या सर्व घटनेने अनेक अधिकाऱ्यांचा वेळ वाया जात असून केवळ गलिच्छ राजकारणासाठी त्यांचा वापर करण्यात येत आहे. अशामुळे खरंच देशाची प्रगती होणार आहे का? असा प्रश्न केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केला.

3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन

ईडीने केलेल्या छापेमारीतून काय प्राप्त झाले हे सध्यातरी स्पष्ट झाले नसून दिल्ली, पंजाब व हैद्राबाद इत्यादी जागी झालेल्या छापेमारीतून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना सूचनावजा इशारा देण्याचा केंद्राचा हा प्रयत्न तर नव्हता ना? हा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.