Take a fresh look at your lifestyle.

ईडीचे छापे सुरूच; पत्राचाळप्रकरणी दस्तावेज जप्त

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना या अगोदरच अटक केल्यानंतर या प्रकरणी काही नवीन धागेदोरे मिळविण्याच्या उद्देशाने मुंबईतील तीन वेगेवेगळ्या भागात आज सकाळी छापे टाकले. दरम्यान मुलुंड, भांडुप व विक्रोळी परिसरात ईडीने टाकलेल्या छाप्यात अनेक, महत्वाची कागदपत्रे जप्त केली गेली आहे.

नितीश कुमार सरकार अल्पावधीतच कोसळेल – रामदास आठवले

पत्राचाळ पुनर्विकासाच्या नावाखाली बेकायदा १०७४ कोटी रुपये जमवले असल्याने परंतु यातून चाळीचा काहीही विकास न झाल्यामुळे हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी प्रवीण राऊतने या सर्व प्रकरणातून जमवलेली गैरमालमत्ता कुटुंबियांच्या खात्यात जमा केली आहे, यामध्ये संजय राऊत व त्यांची पत्नी वर्षा राऊतचादेखील समावेश आहे. सध्या संजय राऊत तुरुंगात असून ईडीला मिळालेल्या नवीन कागदपत्रातून राऊतांच्या अडचणीत वाढ होणार की नाही, हे बघणे महत्वाचे ठरेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.