Take a fresh look at your lifestyle.

Edible Oil खाद्य तेल स्वस्त होणार! केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – खाद्यतेलाच्या (Edible Oil) किमती कमी करण्यासाठी सरकारने (Central Government) पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाम तेलाच्या आधारभूत आयात किमतीत कपात करण्यात आली आहे, तर सोयाबीन तेल आणि सोने आणि चांदीच्या (Gold & Silver Price) आधारभूत आयात किंमतीत (Import Price) वाढ करण्यात आली आहे.

महत्वाची बातमी! खासगी डेअऱ्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका

सरकारने मंगळवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्रूड आणि रिफाइंड पाम तेलाची (Refined Palm Oil) मूळ आयात (Impot)किंमत कमी करण्यात आली आहे, तर क्रूड सोया तेलाची आयात किंमत वाढवण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात सोयाबीन तेल महाग होऊ शकते, तर पामतेलाच्या किरकोळ दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

खासगी वाहनधारकांसाठी मोठी बातमी! वाहनांवरील Toll माफीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

सरकार दर पंधरा दिवसांनी खाद्यतेल आणि सोने-चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत बदल करते. या किमतीच्या आधारे सरकार करही ठरवते. उत्पादनाची मूळ आयात किंमत त्यावर किती कर आकारायचा हे ठरवते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ फक्त मूळ किमतीवर व्यावसायिकांसाठी कर दायित्व ठरवते.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! सोनिया गांधी आणि राहुल गांधी ईडीच्या भोवऱ्यात; देशाच्या राजकारणात खळबळ

गेल्या आठवड्यातही सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने वार्षिक 20 लाख टन सोया तेलाच्या आयातीवरील शुल्क रद्द केले. भारत दरवर्षी सुमारे 60 टक्के खाद्यतेल आयात करतो, जे जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

तेल किती स्वस्त?

कच्चे पाम तेल, जे आधी 1,703 डॉलर प्रति टन आयात केले जात होते, ते आता 1,625 डॉलर प्रति टन दराने उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, RBD पाम तेलाची मूळ आयात किंमत देखील 1,765 डॉलर प्रति टन वरून 1,733 डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे. RBD पामोलिनची मूळ आयात किंमत देखील 1,744 डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे, जी पूर्वी 1,771 डॉलर प्रति टन आयात केली जात होती.

सर्वात स्वस्त ७ सीटर कार! नवीन लूक पाहून थक्क व्हाल; पेट्रोलसह CNG चाही पर्याय उपलब्ध

Comments are closed.