Take a fresh look at your lifestyle.

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे; महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रात सध्या अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतांना दिसत आहेत. सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं. दरम्यान, या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्याविषयी सौम्य भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

पुढचे ५ दिवस अतिमुसळधार पावसाचे! कोकणसह ‘या’ भागांना इशारा

विशेष म्हणजे, विधानसभेत शिंदे गटाने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आम्ही कुठलाही आनंद साजरा केला नसल्याचे सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा देवू नये अशी आमची इच्छा होती असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आमच्यासाठी सन्मानजनक आहेत, आजही आम्हाला त्यांचा आदर आहे मात्र, संजय राऊतांबद्दल बंडखोर आमदारांना आदर असून त्यांच्या मनात राऊतांची प्रतिमा चांगली नाही असंही त्यांनी म्हटलंय. विषेश म्हणजे संजय राऊत हे राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे एजंट आहेत असं केसरकर म्हणाले.

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार; सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

मातोश्रीचं दार उघडल्यानंतर आम्ही नक्की उद्धव ठाकरे यांच्याकडे जावू. उद्धव ठाकरेंना जर आज आमची भूमिका पसंत नसली तरी दोन महिन्यात त्यांना ती भूमिका योग्य वाटेल. असं शिंदे गटाचे आमदार संजय राठोड बुधवारी म्हणाले.

शिंदे गटाचे आणखी एक बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी देखील नुकतंच जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना बोलावलं तर ते चर्चेसाठी नक्की मातोश्रीवर जातील असं वक्तव्य केलं होतं. जर शिंदे यांना बोलावणे आले तर आम्ही यांच्यासहित मातोश्रीवर जावू असं कांदे यांनी म्हटलं होतं.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

दरम्यान, या गोष्टींमुळे सध्या राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सामंजस्य होण्याच्या शक्यता वर्तवला जात आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे भेटणार असतील तर आम्ही मातोश्रीला जावू. मात्र, आम्ही थेट उद्धव ठाकरेेंना भेटू. मात्र यादरम्यान त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बाहेर ठेवायला हवं. अशावेळी केसरकरांचा निशाणा हा संजय राऊतांवर असल्याचं मानलं जातं.

Leave A Reply

Your email address will not be published.