Take a fresh look at your lifestyle.

अखेर शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात मोठा सत्ताबदल पाहायला मिळाला. हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले.

प्रताप सरनाईकांनी फोडले 10 नगरसेवक; शिंदे गटाच्या दाव्यावरून शिवसेना आक्रमक

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील नवं सरकार स्थापन होवून आतापर्यंत दोन आठवडे झाले. पण या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी ठरेल? हा प्रश्नच आहे. सरकार स्थापन होवून 15 दिवस उलटले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. म्हणून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ सुरु असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहेत. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असल्या तरी अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, येत्या 20 जुलैला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचं म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्री शपथ घेतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा 20 जुलैपासून सुरु होईल अशी माहिती आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले, ‘हे’ कारण येत आहे समोर

या मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहे. शिंदे गटामध्ये 40 बंडखोर आमदार आणि 10 अपक्ष आहे, त्यामुळेच शिंदे गटाला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.